अक्षर पटेलची पत्नी मेहानं दिला मुलाला जन्म, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अक्षर पटेलने खूप आनंदाची बातमी दिली आहे. अक्षरची पत्नी मेहा हिने मुलाला जन्म दिला आहे. अक्षरने मंगळवारी संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. 19 डिसेंबरला मेहाला मुलगा झाला. विशेष म्हणजे अक्षर आणि मेहा यांनी त्यांच्या मुलाचे नावही ठेवले आहे.

अक्षर पटेलने मंगळवारी संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने आपल्या मुलाचा टीम इंडियाची जर्सी घातलेला फोटो शेअर केला आहे. मात्र त्याने तोंड दाखवले नाही.

अक्षर आणि मेहा यांचे जानेवारी 2023 मध्ये लग्न झाले. या दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक होती. अक्षर आणि मेहा यांचे लग्न वडोदरात झाले. या दोघांनी 2022 मध्ये एंगेजमेंट केली होती. आता मेहाने मुलाला जन्म दिला आहे. अक्षर आणि मेहा यांनी त्यांच्या मुलाचे नाव हक्ष पटेल ठेवले आहे. अक्षरने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्येही याचा उल्लेख केला आहे.

अक्षर पटेलने अनेक प्रसंगी टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली आहे. अक्षरने भारतासाठी 60 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 568 धावा केल्या आहेत. यासोबतच 64 विकेट्सही घेतल्या आहेत. अक्षरने 14 कसोटी सामन्यात 646 धावा केल्या आहेत. या कालावधीत 55 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने टी-20 इंटरनॅशनलमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे. अक्षरने या फॉरमॅटमध्ये 66 सामने खेळताना 498 धावा केल्या आहेत. यासोबतच 65 विकेट्सही घेतल्या आहेत.