
इचलकरंजी : जवाहर नगर परिसरातील विश्वविनायक मंडळाच्या गणेशोत्सव मंडळात लघुपटांद्वारे संविधानिक मुल्यांचा जागर करणेत आला. या कार्यक्रमात वुमन अँथम, मॅन,लड्डू, संविधान अभंग, पर्यावरणपूरक विसर्जन, शिवरायांचे आज्ञापत्र आदि लघूपट दाखवत चर्चा घडवणेत आली. यात संवादक म्हणून संजय रेंदाळकर यांनी काम केले.
या संवादात सहभागी नागरिकांना महामानवांचे विचारधन मालिकेतील पुस्तके भेट देण्यात आली. तांत्रिक बाजू दामोदर कोळी आणि रोहित दळवी यांनी सांभाळली.
या मंडळाला जोडण्याचे काम समन्वयक म्हणून संविधान संवादक अमोल पाटील यांनी केले.
यावेळी शैलेश गुरल, सविता माळी,गणेश गुरव आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहल माळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी पुस्तके सृजन प्रकाशनने मोफत उपलब्ध करून दिली.