Self care tips : स्वत:ची काळजी घेत असताना ‘या’ चुका टाळा

WhatsApp Group

बदलत्या ऋतुमानानुसार आपण आपल्या शरीराची योग्यरित्या काळजी घेतो का? इतरांच्या काळजीत आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत नाही ना हे तपासून पहा. आपल्या शरीरासोबतच मनाचा देखील आपण विचार करायला हवा.

वाढत्या वयानुसार अनेक महिला स्वतःची योग्य ती काळजी घेतात. अतिरिक्त पैसे खर्च करून स्पा आणि इतर ब्युटी प्रोडक्टसचा वापर करतात परंतु ते योग्य आहे का? हे जाणून घ्या. या गोष्टी करताना आपल्याकडून इतर अनेक छोट्या छोट्या चुका होत असतात. पैसे व वेळ खर्च करून देखील आपल्याला हवा तो बदल मिळत नाही त्यासाठी स्वतःची काळजी घेताना आपण कोणत्या चुका टाळायला हव्या हे जाणून घेऊया.

या चुका टाळा 

१). सुंदर दिसण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी आपण स्पामध्ये जाण्याचा विचार करतो. परंतु, आपण सर्वात आधी आपली महत्त्वाची कामे करायला हवी. कारण स्पामध्ये बराच वेळ आपला जातो त्यामुळे आपण अशा गोष्टींमध्ये किती गुंतायला हवे हे तपासून पहा.

२). बऱ्याचदा पैसे वाचवून आपण आपल्या त्वचेसाठी किंवा शरीरासाठी काही घरगुती उपायांचा वापर करतो. परंतु, सगळेच घरगुती उपाय आपल्याला फायदेशीर ठरतीलचं असं नाही हे लक्षात असू द्या.

३). दुसऱ्याचा सल्ला घेऊन किंवा सेलिब्रिटीच्या सेल्फ-केअर रूटीनचे पालन करायला आपल्या अधिक आवडते. पण हे चुकीचे आहे त्यामुळे त्याचा चुकीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यासाठी आपल्या शरीरासाठी योग्य काय आहे हे जाणून घ्या.

४). स्वत: साठी पैसे खर्च करण्यात काही वाईट नाही. परंतु, कॉस्मेटिक किंवा इतर गोष्टींवर आपण किती पैसे खर्च करतोय हे लक्षात घ्या. अतिरिक्त पैसे खर्च केल्यामुळे आपल्याला महिन्याच्या शेवटी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.