व्यायाम करत असताना या चुका टाळा…

WhatsApp Group

व्यायामामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतो. परंतु, योग्य प्रकारे व्यायाम न केल्यामुळे शरीराला दुखापत होते. दुखणे उद्भवू शकते. सावधगिरी बाळगून आणि योग्य मार्गदर्शनाने व्यायामातील चुका टाळा…

रिकाम्या पोटी व्यायाम

रिकाम्या पोटी व्यायाम केल्यामुळे ऊर्जा कमी होते आणि त्यामुळे अशक्तपणा जाणवतो. त्यासाठी काहीतरी हलकंफुलकं खावं. जसे द्राक्षे, केळी, संत्री ही फळे खाल्ल्यानंतर १० ते ३० मिनिटांनी व्यायाम करू शकता. दूध किंवा पोळीसारख्या पदार्थांचे सेवन केले असेल तर जवळपास ४५ मिनिटांनंतर व्यायाम करू शकता.

गटगट पाणी पिणे

व्यायाम करत असताना पाणी अजिबात पिऊ नये. तहान लागली तरी थोडेच पाणी प्यावे. कारण यामुळे शरीरामध्ये पाण्याचा स्तर सामान्य राहतो. बरेचदा लोक व्यायाम आणि खेळादरम्यान खूप पाणी पितात; परंतु असं करणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.

Parenting Tips : मुलांच्या बाबतीत निर्णय घेत असताना ‘या’ चुका करु नका

घट्ट कपडे घालणे

बरेच लोक व्यायाम करत असताना घट्ट कपडे घालतात. त्यामुळे मांसपेशींचा व्यायाम योग्य प्रकारे होत नाही आणि व्यायामाचाही काहीच फायदा होत नाही. सैल कपडे वापरावेत.

वाॅर्मअप न करणे

व्यायाम करण्यापूर्वी वाॅर्मअप करा. जसे धावणे, स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग न करता व्यायाम केला तर शरीराला दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर स्ट्रेचिंग करणे गरजेचे आहे.

जास्त व्यायाम करणे

गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे शरीराला थकवा आणि दुखापत होण्याची शक्यता असते. अनेक जण स्ट्रेचिंग न करता सरळ बॅडमिंटन खेळतात. यामुळे मांसपेशींना त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

व्यायामानंतर आराम न करणे

व्यायाम केल्यानंत शरीराला आराम देणे गरजेचे आहे. अनेक जण आराम करत नाहीत. एखाद्या दिवशी खूप जास्त व्यायाम झाला तर दुसऱ्या दिवशी शरीराला आराम देणे गरजेचे आहे. शिवाय पुरेशी झोपही आवश्यक आहे.