Avinash Sable wins gold medal बीडच्या सुपुत्राने एशियन गेम्समध्ये भारताला मिळवून दिले सुवर्ण पदक

WhatsApp Group

भारताचा आघाडीटा धावपटू अविनाश साबळे याने Avinash Sable सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा मध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेस फायनलमध्ये पहिले स्थान पटकावत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे 2023 च्या आशियाई क्रीडा Asian Games 2023 स्पर्धेतील ट्रॅक आणि फिल्डमधील भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा अविनाश साबळे पहिला भारतीय ठरला आहे.


अविनाश साबळेने आज चीनमध्ये महाराष्ट्राचे नाव गाजवले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मराठमोळ्या अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 8:19:53 मिनिटांत पूर्ण केले. या स्पर्धेतील भारताचे हे 12वे सुवर्णपदक आहे. बॅडमिंटनमध्ये भारताची चीनशी टक्कर सुरूच आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत आहेत. शेवटचा सामना जिंकणारा संघ सुवर्णपदक जिंकेल.

‘मी काहीही झाले तरी सुवर्णपदकासाठी वचनबद्ध होतो.मी वेळेवर खूश नाही, पण जेव्हा मी स्क्रीन पाहिली आणि मला चांगली आघाडी मिळाली आहे, तेव्हा मी सावकाश होऊन पदक सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला. मी वैयक्तिक सर्वोत्तम रेकॉर्डसाठी जाऊ शकलो असतो. पण ते दुसऱ्या स्पर्धेसाठी राखून ठेवलंय. सुवर्णपदक जिंकून मी आनंदी आहे’ = सुवर्ण पदक जिंकल्यानंतर अविनाश साबळेची प्रतिक्रिया ( Avinash Sable becomes first Indian to win 3000m steepchase gold in Asian Games. )