
Avatar 2 Box Office Collection: अखेर तो क्षण आला, ज्याची गेल्या 13 वर्षांपासून सर्व प्रेक्षक वाट पाहत होते. हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ म्हणजेच अवतार 2 (Avatar The Way Of Water) चित्रपटगृहात दाखल झाला आहे. अलम म्हणजे ‘अवतार 2’ ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री करून बक्कळ कमाई केली आहे. या हॉलिवूड चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी किती कोटींची कमाई केली हे जाणून घेऊया.
दिग्दर्शक जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. शुक्रवारी, 16 डिसेंबर रोजी रिलीज झाल्याने या चित्रपटाने प्रेक्षकांची प्रतीक्षा संपवली आहे. ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात करेल, अशी अपेक्षा होती, तेच झालं.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, अवतार पार्ट 2 ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 40 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या शानदार सुरुवातीने ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ने हे सिद्ध केले आहे. आगामी काळात ‘अवतार 2’ कमाईच्या बाबतीत विक्रम करेल.
या सौंदर्यवतींनीही परिधान केली आहे ‘केशर बिकिनी’, पहा सर्वांचे फोटो
पहिल्याच दिवशी मोठी कमाई करणाऱ्या ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ने पहिल्याच दिवशी कलेक्शनच्या बाबतीत अनेक हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे. 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ‘अवतार 2’ ने मार्वल युनिव्हर्सचा सुपरहिट चित्रपट ‘स्पायडर-मॅन – नो वे होम’ 32 कोटी आणि ‘अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’ने 31 कोटींचा ओपनिंग डे बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकले आहे.