‘या’ स्टार क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा, न्यूझीलंडविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

WhatsApp Group

आशिया कप स्पर्धेदरम्यान आणि टी-20 वर्ल्ड कप आधी क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच याची गेल्या काही दिवसापासून खराब खेळी सुरू आहे, तो वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी काही दिवसापासून झगडत आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. अॅरॉन फिंचने शनिवारी आज एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आगामी टी-20 विश्वचषक 2022 नंतर अॅरॉन फिंच टी-20 फॉरमॅटलाही अलविदा करणार असल्याचे वृत्त आहे.

ऑस्ट्रेलिया सध्या टी-20 विश्वचषकाचा चॅम्पियन आहे. यंदा कांगारू संघ आपल्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाचे आयोजन करत आहे. टी-20 विश्वचषक 2022 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. असे मानले जात आहे की 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर अॅरॉन फिंच देखील टी-20 फॉरमॅटला अलविदा करेल.

अॅरॉन फिंचची कारकीर्द 

अलीकडेच अॅरॉन फिंचने असे संकेत दिले होते की तो त्याच्या 11 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा म्हणू शकतो. अॅरॉन फिंचनेही आपल्या कारकिर्दीत 5 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय अॅरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाकडून 145 वनडे आणि 92 टी-20 सामने खेळले आहेत. अॅरॉन फिंचने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 5401 धावा केल्या आहेत, तर टी-20 क्रिकेटमध्ये या खेळाडूने 92 सामन्यांमध्ये 2855 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये अॅरॉन फिंचने 17 अर्धशतकांसह दोनदा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.