एकाच सामन्यात 100 धावा आणि 10 विकेट घेणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

WhatsApp Group

ऑस्ट्रेलियन संघाचे दिग्गज खेळाडू अ‍ॅलन डेव्हिडसन (Alan Davidson) यांचे आज निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. डेव्हिडसन यांनी ऑस्ट्रेलियासाठी एकूण 44 कसोटी सामने खेळले आहेत. डेव्हिडसन हे डावखुरे वेगवान गोलंदाज होते. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 186 विकेट घेतल्या आहेत तर 1 हजार 328 धावा केल्या आहेत. डेव्हिडसन यांनी 1953 ला इंग्लंड विरुद्धच्या अ‍ॅशेज मालिकेमधून ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (cricket australia) शनिवारी जारी केलेल्या शोकसंदेशात म्हटलं आहे की, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील सर्वोत्तम आणि प्रभावशाली खेळाडूंपैकी एक असलेल्या अ‍ॅलन डेव्हिडसन यांचे आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. डेव्हिडसन यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


अ‍ॅलन डेव्हिडसन हे एकाच कसोटी सामन्यात 100 धावा करणारे आणि 10 विकेट घेणारे क्रिकेट विश्वातील पहिले-वहिले क्रिकेटर होते. डेव्हिडसन यांचा हा अविश्वसनीय असा विक्रम क्रीडाप्रेमींच्या नेहमीच स्मरणात राहील. त्यांनी क्रिकेट NSW चे अध्यक्ष म्हणून 33 वर्षे, विश्वस्त म्हणून 20 वर्षे काम केले आहे. 1979-84 दरम्यान त्यांनी ऑस्ट्रेलियन कसोटी निवडकर्ता म्हणूनही पाच वर्षे काम केलं आहे.


डेव्हिडसन यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल अनेक सन्मान देण्यात आले आहेत. त्यांना Order of the British Empire चे सदस्य देखील बनवले गेले होते. त्यांना 1964 आणि 1987 मध्ये ‘Order of Australia’ ने सन्मानित करण्यात आले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष Richard Freudenstein म्हणाले की, अ‍ॅलन डेव्हिडसन यांचे निधन हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि जगभरातील क्रिकेटसाठी एक दुःखद क्षण आहे