Women’s T20 World Cup Final: महिला T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयानंतर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 6 गडी गमावून 156 धावा केल्या. 157 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 137 धावा करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 6 गडी गमावून 156 धावा केल्या. 157 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 137 धावा करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.
Australia write another chapter in their incredible history #T20WorldCup
— cricket.com.au (@cricketcomau) February 26, 2023
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ऑस्ट्रेलियाच्या नावावर सर्वाधिक ट्रॉफी
2009 मध्ये, इंग्लंड संघाने न्यूझीलंड संघाचा पराभव करून प्रथमच महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 2010 मध्ये पुन्हा न्यूझीलंडचा संघ सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला होता आणि यावेळी त्याचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. पहिल्यांदा जेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2012 आणि 2014 मध्ये इंग्लंड संघाला दोनदा पराभूत करून वर्ल्डकपची हॅट्ट्रिक साजरी केली.
2016 मध्ये, वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि त्यांना सलग चौथे विजेतेपद जिंकण्यापासून रोखले. या पराभवानंतर, संघाने पुन्हा एकदा पुनरागमन केले आणि प्रथम 2018 आणि नंतर 2020 मध्ये महिला T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आणि 5 वेळा काबीज करणारा संघ होण्याचा मान मिळविला.