Australia World Cup 2023 squad: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर सुरू होणार आहे. क्रिकेटच्या महाकुंभमध्ये ऑस्ट्रेलियन संघ 8 ऑक्टोबरला भारताविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी सर्वाधिक पाच वेळा जिंकली आहे. आता ऑस्ट्रेलियाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आले आहे.
या खेळाडूंना संधी मिळाली
भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने 15 खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. पॅट कमिन्स वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याला साथ देण्यासाठी जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि शॉन अॅबॉट यांना संघात संधी मिळाली आहे. अॅश्टन अगर आणि अॅडम झम्पा यांचा फिरकीपटू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या फलंदाजांना संधी मिळाली
डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड यांचा संघात फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर अॅलेक्स कॅरी आणि जोस इंग्लिस यांना यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. कॅरीने गेल्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी तो कर्णधाराची पहिली पसंती असेल.
The Aussies have trimmed their squad for the ODI World Cup!
— cricket.com.au (@cricketcomau) September 6, 2023
संघात चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश
एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी भारतीय संघात चार अष्टपैलू खेळाडूंना संधी मिळाली आहे. मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि कॅमेरॉन ग्रीन हे खेळाडू फलंदाजी तसेच गोलंदाजीमध्ये पारंगत आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी सांगितले की, काही खेळाडू दुखापतीतून सावरत आहेत आणि ते लवकरच तंदुरुस्त होतील अशी अपेक्षा आहे. सर्व खेळाडू या महिन्याच्या अखेरीस भारताविरुद्धच्या मालिकेत खेळतील आणि त्यापूर्वी जखमी खेळाडूंना तंदुरुस्त घोषित केले जाईल.
एकदिवसीय विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.