महिला विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम 305 धावा केल्या आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ 147 धावांवर आटोपला. कांगारू संघाने 157 धावांनी सामना जिंकला Australia beat West Indies .
धावाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने एकदा विकेट गमावण्यास सुरुवात केल्यानंतर ते पुन्हा रुळावर आले नाहीत. कॅरेबियन संघ काही जोर दाखवेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. डॉटिनने काही चांगले शॉट्स खेळले पण ते पुरेसे नव्हते.
आजवर ऑस्ट्रेलियन महिला संघ 9 वेळा महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तसेच ऑस्ट्रेलियन महिला संघाने आजवर ६ वेळा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरेल आहे. ऑस्ट्रेलियम महिला संघाने 1978, 1982, 1988, 1997, 2005 आणि 2013 मध्ये विश्वविजेतेपद पटकावले आहे.
#TeamAustralia beat West Indies by 157 runs to secure their spot in the #CWC22 final. pic.twitter.com/CAxkAaXBDc
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 30, 2022
ICC महिला विश्वचषक 2022 चा पहिला उपांत्य सामना सहा वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात बुधवारी बेसिन रिझर्व्ह येथे खेळला गेला.ऑस्ट्रेलियन संघाने या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर दक्षिण आफ्रिकेकडून भारताच्या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा संघ अंतिम चारमध्ये पोहोचला आहे.