AUS vs SL T20 WC: मार्कस स्टॉइनिसच्या झंझावाती खेळीने उडवला श्रीलंकेचा धुव्वा, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने उघडले विजयाचे खाते

WhatsApp Group

मार्कस स्टॉइनिसच्या झंझावाती अर्धशतकामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने मंगळवारी पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ICC T20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. स्टॉइनिसने 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. स्टॉइनिसने 18 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 59 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना श्रीलंकेला 6 बाद 157 धावांवर रोखले आणि त्यानंतर 16.3 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. स्टॉइनिसशिवाय ग्लेन मॅक्सवेलने 12 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार अॅरॉन फिंचने 42 चेंडूत नाबाद 31 आणि मिचेल मॅशरने 17 तर डेव्हिड वॉर्नरने 11 धावांचे योगदान दिले.

या स्पर्धेतील कांगारूंचा हा पहिलाच विजय असून आता ऑस्ट्रेलियाचेही गुणतालिकेत 2 गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. सुपर-12 च्या ग्रुप 1 मधील दोन सामन्यांमधला श्रीलंकेचा हा पहिला पराभव आहे. ऑस्ट्रेलियाला आपला पुढचा सामना शुक्रवारी मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे.

स्टॉइनिसशिवाय ग्लेन मॅक्सवेलने 12 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार अॅरॉन फिंचने 42 चेंडूत नाबाद 31 आणि मिचेल मार्शने 17 तर डेव्हिड वॉर्नरने 11 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेचा मुख्य गोलंदाज वानिंदू हसरंगाने या सामन्यात खूपच खराब गोलंदाजी केली. हसरंगाने 3 षटकात एकही विकेट न घेता 53 धावा दिल्या. धनंजय डिसिल्वा, महेश टीक्षाना आणि चमिका करुणारत्ने यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.