AUS vs SL : क्रिकेटच्या मैदानात मोठी दुर्घटना, ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात येताच स्टँड कोसळले, पाहा व्हिडिओ 

WhatsApp Group

श्रीलंका विरद्ध ऑस्ट्रेलिया (SL vs AUS) यांच्यात गॉलमध्ये पहिली टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी व्यवस्थित खेळ झाला. पण, दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वीच पाऊस आणि वादळाने अडथळा निर्माण केला. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ वेळेत सुरू झाला नाही. त्याचबरोबर एक स्टँड देखील कोसळून पडले. ऑस्ट्रेलियन टीम मैदानात दाखल होताच काही वेळानं झालेल्या या घटनेमुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.

गॉलच्या मैदानातील हे तात्पुरते उभारण्यात आलेले स्टँड होते. सुदैवाची बाब म्हणजे हा अपघात झाला त्यावेळी तिथे कोणताही प्रेक्षक नव्हता. त्यामुळे या अपघातामध्ये कुणीही जखमी झाले नाही. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी जवळपास 90 मिनिटे मुसळधार पाऊस झाला. यावेळी वारा देखील वेगाने सुटला होता. त्यामुळे हे स्टँड कोसळले.

पावसामुळे ग्राऊंड स्टाफने सर्व पिच झाकलं, पण मैदानातील काही भागात दोरीने कव्हर अंथरण्यात आले होते. ते कव्हर वाऱ्यानं उडाले. पाऊस आणि वादळामध्ये संपूर्ण मैदान झाकण्यासाठी ग्राऊंड स्टाफला चांगलाच संघर्ष करावा लागला.