August 2022 Festivals: ‘हे’ आहेत ऑगस्ट महिन्यातील प्रमुख सण-उत्सव, तारखांची संपूर्ण यादी येथे पहा!

WhatsApp Group

भारत हा विविध जाती आणि धर्मांचा देश आहे, म्हणूनच येथे रंगीबेरंगी सण आणि उत्सव त्यांच्या स्वतःच्या परंपरा आणि स्वतःच्या संस्कृतीने साजरे केले जातात. खऱ्या अर्थाने पाहिल्यास ऑगस्ट महिन्यापासून सणांची नवी मालिका सुरू होते. यावर्षी ऑगस्ट महिन्याची सुरुवात नागपंचमी (2 ऑगस्ट) आणि फ्रेंडशिप डेने होत आहे. यानंतर, भाऊ-बहिणींचा पारंपारिक आणि पवित्र सण, रक्षाबंधन (11 ऑगस्ट), कृष्ण जन्माष्टमी (19 ऑगस्ट) भगवान विष्णूचा 8 वा अवतार म्हणून आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव(31 ऑगस्ट).

या महिन्यात संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाचा (75 वा) अमृत महोत्सवही राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणार आहे. याशिवाय या महिन्यात पुत्रदा एकादशी, अजा एकादशी, नारळी पौर्णिमा, काजरी तीज, हरियाली तीज आदी सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवसही साजरे केले जातील.

ऑगस्ट 2022 

  • 01 ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह, बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी
  • 02 ऑगस्ट (मंगळवार) नाग पंचमी
  • 05 ऑगस्ट (शुक्रवार) श्री दुर्गाष्टमी व्रत. (ऑगस्टचा पहिला शुक्रवार) आंतरराष्ट्रीय बिअर दिवस
  • 06 ऑगस्ट (शनिवार) हिरोशिमा दिन
  • 07 ऑगस्ट (ऑगस्टचा पहिला रविवार) फ्रेंडशिप डे, राष्ट्रीय हातमाग दिवस
  • 08 ऑगस्ट (सोमवार) श्रावण पुत्रदा एकादशी
  • 09 ऑगस्ट (मंगळवार) प्रदोष व्रत
  • 10 ऑगस्ट (बुधवार) माजी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांचा वाढदिवस
  • 11 ऑगस्ट (गुरुवार) रक्षाबंधन

 

  • 12 ऑगस्ट (शुक्रवार) श्रावण महिन्यातील पौर्णिमा व्रत, आंतरराष्ट्रीय युवा दिन, जागतिक हत्ती दिन
  • 13 ऑगस्ट (शनिवार) जागतिक अवयवदान दिन, आंतरराष्ट्रीय डाव्या हातांचा दिवस
  • 14 ऑगस्ट (रविवार) काजरी तीज व्रत
  • १५ ऑगस्ट (सोमवार) भारतीय स्वातंत्र्य दिन, संकष्टी चतुर्थी, राष्ट्रीय शोक दिन (बांगला देश)
  • 17 ऑगस्ट (बुधवार) हलष्टी व्रत, वृद्धा गौरी व्रत
  • 19 ऑगस्ट (शुक्रवार) जन्माष्टमी
  • 20 ऑगस्ट (शनिवार) भारतीय अक्षय ऊर्जा दिवस
  • 22 ऑगस्ट (सोमवार) नारळी पौर्णिमा
  • 23 ऑगस्ट (मंगळवार) जा एकादशी

 

  • 24 ऑगस्ट (बुधवार) प्रदोष व्रत
  • 25 ऑगस्ट (गुरुवार) – मासिक शिवरात्री
  • 26 ऑगस्ट (शुक्रवार) पिठोरी अमावस्या आंतरराष्ट्रीय श्वान दिन
  • 27 ऑगस्ट (शनिवार) भाद्रपद अमावस्या
  • 29 ऑगस्ट (सोमवार) राष्ट्रीय क्रीडा दिन
  • 30 ऑगस्ट (मंगळवार) हरतालिका तीज व्रत, राष्ट्रीय लघु उद्योग दिन
  • 31 ऑगस्ट (बुधवार) श्री गणेश उत्सव चतुर्थी