
सावंतवाडी – सावंतवाडी येथील शेजारच्या एका गावात अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारचाकी वाहनातून आलेल्या काहींनी शाळेत जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने अपहरण करणाऱ्याच्या हाताचा चावा घेतला आणि आपली सुटका करून घेतली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शाळेत जाऊन तिने हा प्रकार शिक्षकाना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. या संपूर्ण प्रकाराने सावंतवाडी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी नाकाबंदी करत अपहरणकर्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुलीसह तिच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.