
भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात हा संघ गुरुवारपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने यजमानांचा पराभव केला होता. भारताने हा सामना 10 विकेटने जिंकला. यासह पाहुण्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, सामना सुरू होण्याआधीच असे काही घडले की इशान किशन चर्चेचा विषय बनला आहे.
सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे राष्ट्रगीत गायले जाते. यादरम्यान इशानवर हल्ला झाला. हा हल्ला टाळण्यासाठी इशान किशनने खूप काही केले आणि तो यशस्वीही झाला. इशानवर हा हल्ला कोणा माणसाने नाही तर एका कीटकाने केला आहे.
दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी उभे असताना इशानला किडा तोंडाजवळ आल्याने तो अडचणीत आला. भारताचे राष्ट्रगीत वाजत होते. इशान डोळे मिटून राष्ट्रगीत म्हणत होता. तेव्हा एका किड्याने त्याच्यावर हल्ला केला. हा किडा त्यांच्या मागून आला आणि आधी गालावर आणि नंतर मानेवर तो किडा बसला. ईशानला काहीतरी जाणवताच त्याने डोळे उघडले आणि तो किडा उडून गेला पण पुन्हा आला. ईशानने पुन्हा वाकून स्वत:ला त्यातून वाचवले.
— Bleh (@rishabh2209420) August 18, 2022
या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांना केवळ 189 धावा करता आल्या. झिम्बाब्वे संघाकडून रेगिस चाकावाने सर्वाधिक 35 धावा केल्या. ब्रॅड इव्हान्सने नाबाद 33 धावा केल्या. त्याने रिचर्ड नागरवासोबत नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर झिम्बाब्वेचा संघ 180 च्या पुढे जाऊ शकला. रिचर्डने 34 धावांचे योगदान दिले. त्याने 42 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने इतक्या धावा केल्या. इव्हान्सने 29 चेंडूंचा सामना करत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. हे लक्ष्य गाठण्यात भारताला कोणतीही अडचण आली नाही. भारताने 10 गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियासाठी शुभमन गिलने 72 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 1 षटकार ठोकला. शिखर धवनने 81 धावांची खेळी खेळली. धवनने आपल्या खेळीत नऊ चौकार मारले.