Breaking: भाषण सुरू असतानाच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भर सभेत हल्ला

WhatsApp Group

Ex-Japan PM Shinzo Abe यांच्यावर भरसभेत हल्ला झाला आहे. शुक्रवारी Nara च्या रस्त्यावर सभेला संबोधित करताना त्यांच्यावर पाठीमागून हल्ला झाला आहे. सध्या जखमी अवस्थेमध्ये असलेल्या शिंजो आबे यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी मारेकर्‍याला देखील ताब्यात घेतले आहे.

जपानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारो शहरामध्ये शिंजो आबे भाषण करत होते. त्यावेळी संदिग्ध आरोपीने पाठीमागून त्यांच्याशी संपर्क केला आणि अचानक गोळी झाडली. हल्लेखोरांनं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता. जपानी पोलिसांनी संदिग्ध हल्लेखोराला अटक केली आहे.