नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. काही असामाजिक तत्त्वांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले आहेत.
तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. तर भाजपच्या गुंडांनीच हा हल्ला केला आहे असा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात येत आहे.
सिसोदिया यांनीही या हल्ल्याला भाजप जबाबदार असल्याचे म्हटलए आहे. मात्र, आपच्या या आरोपावर भाजपकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप (BJP) यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.
केजरीवाल की हत्या करवाना चाहती है बीजेपी! https://t.co/JnhCi41Oee
— Manish Sisodia (@msisodia) March 30, 2022
मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून या हल्ल्याचे संपूर्ण खापर भाजपवर फोडले आहे. भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली आहे. भाजपच्या पोलिसांनी या गुंडांना रोखण्याऐवजी केजरीवालांच्या घरापर्यंत त्यांना घेऊन गेले, असा आरोपही सिसोदिया यांनी केला आहे.
बीजेपी के गुंडे CM @ArvindKejriwal जी के घर पर तोड़फोड़ करते रहे. बीजेपी की पुलिस उन्हें रोकने की जगह उन्हें घर के दरवाज़े तक लेकर आई. https://t.co/oSFc2kWaDC
— Manish Sisodia (@msisodia) March 30, 2022