मेरठ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. एआयएमआयएम प्रमुख आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे attack on aimim chief Asaduddin Owaisi.
मेरठमधील छिजारसी टोल प्लाझाजवळ ही घटना घडली. खुद्द असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करून वाहनावर गोळीबार केल्याची माहिती दिली आहे.
खासदार ओवेसी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘काही वेळापूर्वी माझ्या गाडीवर छिजारसी टोल प्लाझाजवळ गोळीबार झाला आहे. हा हल्ला करण्यासाठी ३-४ जण आले होते, हे सर्वजण हातीतल शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. या गोळीबारात माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. अलहमदुलिल्लाह.’
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
खासदार ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या घटनेची उत्तर प्रदेश पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. एवढेच नाही तर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.