Assembly Election 2024 : “निलेश राणेंना कुडाळ मतदार संघातून उमेदवारी दिली तर आम्ही…” उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

WhatsApp Group

Assembly Election 2024 : माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांची कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. याच पार्श्भूमीवर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती आहे.

कुडाळची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत येणार की कुडाळची जागेची अदलाबदल होऊन भाजपला देणार, याविषयी चर्चा सुरू आहेत. याविषयी मंत्री उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे.

“नारायण राणे हे विद्यमान खासदार आहेत. ते कोकणातल्या विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असावी.

कुडाळ-मालवण विधानसभेवर आमचा (शिवसेना शिंदे गट) दावा आहे. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना अधिकार आहेत. निलेश राणे यांना या मतदार संघातून उमेदवारी दिली, तर आम्ही त्यांचं काम करू,” असे उदय सामंत यांनी सांगितलं.