‘सरळ वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

WhatsApp Group

सरळ वास्तू (Saral Vastu) फेम चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांची हत्या करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी (Hubballi) जिल्ह्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मंगळवारी (5 जुलै) सकाळी चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली. चंद्रशेखर गुरुजी यांचे नाव चंद्रशेखर अंगडी (Chandrashekhar Angadi) असं होतं. मात्र त्यांना चंद्रशेखर गुरुजी नावाने ओळखलं जात असे. ‘सरळ-वास्तू’ हा त्यांचा कार्यक्रम विविध वृत्तवाहिन्यांतून प्रसारीत होत असे. त्यामुळे ते वृत्तवाहिन्या आणि त्यांच्या वास्तू प्रयोगांमुळे घराघरांमध्ये पोहोचले होते.

हुबळी येथील हॉटेलमध्ये मारेकऱ्यांनी चाकूने भोसकत चंद्रशेखर यांची हत्या केली.हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.