जलंधर – पंजाबच्या जलंधरमध्ये सोमवारी संध्याकाळी कबड्डी खेळाडूची (Kabaddi Player Shot Dead) गोळी मारून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. एका कबड्डी स्पर्धेदरम्यान काही अज्ञातांनी गोळीबार केला. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नंगल अंबिया (Sandeep Nagal Ambiya) याची गोळी मारून हत्या झाल्यानंतर स्टेडियममध्ये गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेच्या एका सामन्या दरम्यान अचानक बेछूट गोळीबार सुरू झाला. या गोळीबारामध्ये कबड्डी टीममध्ये असलेल्या संदीप नंगर अंबियाला सगळ्या गोळ्या लागल्या. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या दर्शकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. गोळीबार केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने पळ काढला.
ग्राऊंडवर उपस्थित असलेल्या व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीपवर जवळपास 20 राऊंड फायर करण्यात आले, यातल्या बऱ्याच गोळ्या त्याच्या डोक्याला आणि छातीवर लागल्या. गोळीबार करणारे जवळपास 12 जण होते. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
International Kabaddi player Sandeep Singh Nangal shot dead in #Jalandhar
It has started… the deterioration..
Mark my words.. AAP has no interest nor experience in running law & order.. especially in a border state..
I shudder to think what Punjab will become pic.twitter.com/x2VXxfPB8q
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) March 14, 2022
संदीपने एका दशकापेक्षा जास्त काळ कबड्डीच्या दुनियेवर राज्य केले होते. त्याने पंजाबशिवाय कॅनडा, अमेरिका, ब्रिटेनमध्येही आपल्या खेळाची प्रतिभा दाखवली. मृत्यूआधी संदीप एका कबड्डी महासंघाचे प्रबंधन पाहत होता.