Assam Flood : आसाममध्ये पुरामुळं जनजीवन विस्कळीत, 32 जिल्ह्यांना फटका, 54 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता

WhatsApp Group

Assam Flood : आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या चिरांग जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणची हजारो लोक बाधित झाले आहेत. अनेक लोकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आले आहे.

राज्यातील 32 जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. दरम्यान, SDRF च्या पथकांनी 100 हून अधिक जणांची सुखरुप सुटका केली आहे. हे सर्वजण पुरात अडकले होते. या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

राज्यातील 35 जिल्ह्यातील 32 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या 28 जिल्ह्यांतील 2 हजार 930 गावांमधील 19 लाख लोक बाधित झाले आहेत. मुसळधार पावसानंतर दरड कोसळून दोन मुलांसह नऊ जणांना जीव गमवावा लागला आहे. या पुरामुळं आत्तापर्यंत 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. खेड्यापाड्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे घरं पाण्याखाली जात आहेत. इतकेच नाही तर येथील जवळपास 64 रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. NH-15 हा पूर्णपणे पाण्यात आहे. याशिवाय दारंग जिल्ह्यात पूल तुटल्याची माहिती समोर येत आहे.