Asia Cup 2024 : भारतीय महिला संघाची अंतिम फेरीत धडक, रेणुका सिंगनं इतिहास रचला

भारतीय महिला संघानं आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी झाला. भारतानं हा सामना दहा गडी राखून जिंकला.

WhatsApp Group

IND W vs BAN W : महिला आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशशी झाला. या सामन्यात टीम इंडियाने दहा गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशनं 20 षटकांत 8 गडी गमावून 80 धावा केल्या. भारतानं अवघ्या 11 षटकांत ही धावसंख्या गाठली.

11 षटकांत लक्ष्य गाठलं

81 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली होती. शेफाली आणि स्मृती मानधना यांनी अवघ्या 11 षटकांत ही धावसंख्या गाठली. शफाली वर्मानं 28 चेंडूत 26 धावा केल्या. याशिवाय स्मृती मानधनानं 39 चेंडूत 55 धावा केल्या. स्मृती मानधनानं या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार लगावला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशला 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 80 धावा करता आल्या. कर्णधार निगार खान हा एकमेव फलंदाज होता जो भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला. निगारने 51 चेंडूत 32 धावा केल्या. याशिवाय शोर्णा अक्तरने नाबाद 19 धावा केल्या. या दोन फलंदाजांशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही.

भारतीय संघाची शानदार गोलंदाजी

भारतीय संघाने उत्कृष्ट गोलंदाजी केली. रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी शानदार गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना धावा करणे कठीण केले. रेणुका सिंगनं 4 षटकात केवळ 10 धावा देऊन 3 बळी घेतले आणि राधानं 4 षटकात 14 धावा देऊन 3 बळी घेतले. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी 1-1 विकेट घेतली.