Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहा फुकटात, कसे ते वाचा

WhatsApp Group

2023 आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी 10 सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने आले होते तेव्हा पावसामुळे सामना रद्द करण्यात आला होता. आता सुपर-4 मध्ये रोहित सेना आणि बाबर ब्रिगेड यांच्यात लढत होणार आहे.

सुपर-4 मधील पाकिस्तान संघाचा हा दुसरा सामना असेल. बाबर आझमच्या संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. भारतीय संघाचा सुपर-4 मधील हा पहिलाच सामना असेल. भारतीय संघाने साखळी फेरीत नेपाळविरुद्ध शानदार विजय नोंदवला होता.

भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सुपर-4 सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. नाणेफेक अडीच वाजता होईल.

भारत-पाकिस्तान सामना कुठे पाहू शकता?

तुम्ही आशिया कप 2023 मधील भारत-पाकिस्तान सुपर-4 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. भारत-पाकिस्तान सामन्याचे स्टार स्पोर्ट्स हिंदीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. फ्री डिशच्या माध्यमातून डीडी स्पोर्ट्स चॅनलवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

अशा प्रकारे तुम्ही भारत-पाक सामना विनामूल्य पाहू शकता

2023 च्या आशिया चषकातील सुपर-4 चा सामना तुम्ही मोबाईलवर मोफत पाहू शकता. चाहते डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर या संपूर्ण स्पर्धेच्या सर्व सामन्यांचा विनामूल्य आनंद घेऊ शकतात.

पावसामुळे राखीव दिवस ठेवण्यात आला आहे

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 10 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन या सामन्यासाठी फक्त राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसामुळे 10 सप्टेंबरला सामना झाला नाही तर 11 सप्टेंबरला सामना खेळवला जाईल. 10 सप्टेंबरला काही षटकांचा खेळ असेल तर पुढचा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 सप्टेंबरला होईल.