आशिया कप 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली नाही, पण यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने पाकिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी केली. आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला. त्याने झंझावाती इनिंग खेळत महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम मोडला आहे.
टीम इंडियाने रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिलचे विकेट झटपट गमावले. यामुळे भारतीय डाव लवकर आकसत असल्याचे दिसत होते, मात्र यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. इशानने फलंदाजीचे उत्तम उदाहरण मांडले. त्याच्यामुळेच टीम इंडिया सन्मानजनक धावसंख्या गाठू शकली. टीम इंडियासाठी ईशानने 81 चेंडूत 82 धावा केल्या, ज्यात 9 चौकार आणि 2 लांब षटकारांचा समावेश होता.
Ishan Kishan departs, but only after a solid knock of 82 off 81 deliveries.
Live – https://t.co/L8YyqJF0OO… #INDvPAK pic.twitter.com/9goYe8sDO9
— BCCI (@BCCI) September 2, 2023
इशान किशनसोबत केएल राहुललाही आशिया चषकासाठी भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून संधी मिळाली होती, मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध खेळू शकला नाही. त्यामुळेच इशानला संधी मिळाली आणि त्याने दोन्ही हातांनी संधी साधून चमकदार कामगिरी करत ८२ धावा करत आपल्या संघाला प्रभावित करण्यात यश मिळवले. पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकात सर्वात मोठी खेळी करणारा तो यष्टिरक्षक बनला आहे. त्याने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला आहे. धोनीने आशिया कप 2008 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 76 धावांची खेळी केली होती.
पाकिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारे भारतीय यष्टीरक्षक
- इशान किशन – 82 धावा (2023)
- महेंद्रसिंग धोनी – 76 धावा (2008)
- सुरेंद्र खन्ना – 56 धावा (1984)
- महेंद्रसिंग धोनी – 56 धावा (2010)