रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघ 2 सप्टेंबर रोजी कॅंडी येथे आमनेसामने असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत, पण आकडेवारी काय सांगते? दोन्ही संघांमध्ये कोणत्या संघाचा वरचष्मा आहे… वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान 132 वेळा आमनेसामने आले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानचा वरचष्मा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
आकडेवारीत पाकिस्तानचा वरचष्मा…
पाकिस्तानने भारताविरुद्ध 73 सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघ केवळ 55 सामने जिंकू शकला आहे. दोन्ही संघांमधील 4 सामने निकालाशिवाय संपले आहेत. पाकिस्तानने तटस्थ ठिकाणी भारताविरुद्ध 40 सामने जिंकले आहेत. तर भारताने तटस्थ ठिकाणी 33 वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. याशिवाय पाकिस्तानने भारताविरुद्ध त्यांच्याच भूमीवर 14 सामने जिंकले आहेत. तर 11 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
टीम इंडिया पाकिस्तानला हरवू शकेल का?
त्याचबरोबर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध त्यांच्याच भूमीवर 11 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाला घरच्या मैदानावर 19 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशाप्रकारे, एकदिवसीय फॉरमॅट भारताविरुद्ध पाकिस्तानचा वरचष्मा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पण या आकड्यांसमोर भारतीय संघ आशिया चषकात पाकिस्तानला पराभूत करू शकेल का? हे पाहणे मनोरंजक असेल. विशेष म्हणजे 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचे संघ कॅंडीमध्ये आमनेसामने असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजल्यापासून होणार आहे.