
आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) या दोन्ही संघामध्ये उद्या 28 ऑगस्ट रोजी मोठा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार सराव करत असून एकीकडे विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाला एकतर्फी सामन्यात पराभूत करणाऱ्या पाकिस्तानी संघाची मान उंचवली होती, त्यामुळे आता भारतीय संघही पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे जर आपण दोन्ही संघाच्या T20 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर, दोन्ही संघांमध्ये T20 चे 9 सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 7 सामने जिंकले आहेत आणि पाकिस्तान संघाने 2 सामन्यामध्ये विजय मिळवला होता.
भारत आणि पाकिस्तानमधील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान भारतापेक्षा पुढे असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक, भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानने 87 सामने जिंकले आहेत, तर भारताने 71 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे 42 सामने निकालाविना झाले आहेत. तर दुसरीकडे सर्व सामने स्वतंत्रपणे पाहिल्यास, भारत आणि पाकिस्तानमध्ये 132 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानने 73 आणि भारताने 55 सामने जिंकले होते. वनडेमधील चार सामने निकालाशिवाय झाले आहेत.
We 𝐂𝐚𝐧’𝐭 𝐤𝐞𝐞𝐩 𝐂𝐚𝐥𝐦, ‘coz the #GreatestRivalry is almost here! 🤩#BelieveInBlue & send in your 💙 for #TeamIndia for the DP World #AsiaCup2022!#INDvPAK: Aug 28, starts 6 PM | Star Sports & Disney+Hotstar pic.twitter.com/qtjmZhbIK9
— Star Sports (@StarSportsIndia) August 27, 2022
पाकिस्तान आणि भारताचा संघ कसोटीत 59 वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी पाकिस्तानने 12 तर भारताने 9 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये कसोटीत 38 सामने झाले आहेत. मात्र, T20 मध्ये भारताचा वरचष्मा मात्र कायम राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत T20 चे 9 सामने झाले आहेत. जिथे भारताने 7 आणि पाकिस्तानने 2 सामने जिंकले आहेत.
आशिया कप 2022 यावेळी T20 फॉरमॅटमध्ये खेळाला जात असल्याने त्याचबरोबर T20 मध्येही भारताचे पारडे पाकिस्तानवर जड तर आहेच त्याशिवाय या परिस्थितीत भारताची आशिया चषक जिंकण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील सामन्यात मोठी रंगत येणार आहे.
दोन्ही संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.