Asia Cup 2022: आशिया कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, पाकिस्तानचाही नवा अवतार पाहायला मिळणार

WhatsApp Group

Asia Cup 2022: आशिया कप 2022 साठी सर्व संघांची तयारी जोरात सुरू आहे. या स्पर्धेसाठी युएईमध्ये सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर हे जेतेपद पटकावण्यासाठी सर्वच संघ जोरदार सराव करत आहेत. दरम्यान, भारतीय संघाने आशिया कपसाठी नवी जर्सी जारी केली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आशिया कपच्या जर्सीतील भारतीय संघाचा फोटो शेअर केला आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान संघानेही आपली नवी जर्सी जारी केली आहे.

आशिया कपमध्ये भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. आयसीसी आणि एसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत संघ नवीन जर्सीमध्ये दिसतात. या जर्सींवर टूर्नामेंटचे नावही लिहिलेले आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली असून, टीम इंडियाच्या आशिया चषकाची नवीन जर्सी समोर आली आहे. भारतीय संघाची जर्सी निळ्या रंगाची आहे, तर आशिया कप 2022 चा लोगोही संघाच्या जर्सीवर दिसत आहे. या जर्सीवर तीन स्टारही आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत तीन वेळा विश्वचषक जिंकला आहे. मात्र, जडेजाशिवाय कोणत्याही खेळाडूने नव्या जर्सीत फोटो किंवा व्हिडिओ टाकलेला नाही.

पाकिस्तान संघाचा नवा अवतारही पाहायला मिळणार

भारतीय संघाव्यतिरिक्त पाकिस्तान संघानेही त्यांच्या नवीन जर्सीचा फोटो शेअर केला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली आशिया चषक खेळलेल्या पाकिस्तान संघाने आपल्या नवीन जर्सीचा फोटो प्रसिद्ध केले आहे. त्याच्या नवीन जर्सीमध्ये कर्णधार बाबर आझम आणि संघातील इतर खेळाडू फोटोशूटसाठी पोहोचले होते.

आशिया चषक स्पर्धेत 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत.