Asia Cup 2022: जाणून घ्या आशिया कपमधील भारताची आजवरची कामगिरी

WhatsApp Group

Asia Cup 2022: आशिया कप 2022 येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणाऱ्या या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळण्यात येणार आहे. त्याचबरोबर 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. पहिला आशिया चषक 1984 मध्ये UAE मध्ये खेळला गेला होता, जो भारतीय संघाने जिंकला होता.

आतापर्यंत ही स्पर्धा 14 वेळा आयोजित करण्यात आली असून, त्यापैकी 7 वेळा भारतीय संघाने आशिया कपची ट्रॉफी जिंकली आहे. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेचा संघ 5 वेळा ही ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. भारत हा आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. कोणत्या वर्षी आशिया कपमध्ये भारताची कामगिरी कशी होती आणि कधी कधी ट्रॉफी जिंकली ते आपण जाणून घेऊयात.

आशिया कप 1984, UAE
1984 मध्ये शारजाह, UAE येथे झालेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघाने सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत प्रवेश केला होता. भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून आशिया कप ट्रॉफी जिंकली.
आशिया कप 1988, बांगलादेश
1988 मध्ये झालेल्या आशिया कपला विल्स आशिया कप असेही म्हणतात. बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत चार संघ सहभागी झाले होते. दिलीप वेंगसरकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली.
आशिया कप 1990-91, भारत
आशिया चषक 1990-91 मध्ये भारतात आयोजित करण्यात आला होता. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भारताला पहिल्यांदाच मिळाले होते. आशिया कप भारतात होत असल्याने पाकिस्तानने या स्पर्धेत भाग घेतला नाही. यावेळीही भारतीय संघ अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून चॅम्पियन ठरला होता

 

आशिया कप 1995, UAE
आशिया चषक 1995 मध्ये UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी स्पर्धेत चार संघ सहभागी झाले होते. मात्र, निकाल प्रत्येक वेळी सारखाच राहिला आणि भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करत चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली. येथे मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कप चॅम्पियन बनला.
आशिया कप 2010, श्रीलंका
आशिया चषक 2010 श्रीलंकेत आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत चार संघ सहभागी झाले होते. अंतिम फेरीत श्रीलंकेचा 81 धावांनी पराभव करून भारताने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कप चॅम्पियन बनला होता.
आशिया कप 2016, बांगलादेश
बांगलादेशमध्ये पाचव्यांदा आशिया कपचे आयोजन करण्यात आले होते. तर, प्रथमच ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. या स्पर्धेत पाच संघांनी भाग घेतला, त्यातील अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. भारताने अंतिम सामना 8 गडी राखून जिंकून ट्रॉफी जिंकली.
आशिया कप 2018, UAE
UAE मध्ये आशिया कप 2018 चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये 6 संघांनी भाग घेतला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव करून सातव्यांदा ट्रॉफी जिंकली