Asia Cup 2022: जपानचा भारतावर मोठा विजय, 5-2 ने दिली मात

WhatsApp Group

आशिया चषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात जपानने भारताचा ५-२ने पराभव केला आहे. जपानचा हा सलग दुसरा विजय आहे, तर भारताला अजूनही विजयाचे खाते उघडायचे आहे. जपानने त्यांच्या आधीच्या सामन्यात इंडोनेशियाचा ९-० असा पराभव केला होता. तर भारताने पाकिस्तानसोबत १-१ अशी बरोबरी साधली होती. या सामन्यात भारताकडून फक्त पवन राजभर आणि उत्तम सिंग यांनी गोल केले. भारतासाठी राजभरने ४५व्या मिनिटाला पहिला गोल केला, तर उत्तम सिंगने ५०व्या मिनिटाला दुसरा गोल केला.

तर जपानकडून केन नागयोशीने २४व्या मिनिटाला तर कोसे कावाबेने ४०व्या आणि ५६व्या मिनिटाला दोन गोल केले. कोजी यामासाकीने 50 व्या मिनिटाला चौथा गोल केला. अखेरच्या मिनिटांतही जपानने आणखी एक गोल करत भारताचा 5-2 च्या मोठ्या फरकाने पराभव केला.

‘अ’ गटातील क्रमावरीत जपानचा संघ पहिल्या क्रमांकावर तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत अवघ्या १ गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. गुरुवारी भारताचा सामना यजमान संघ इंडोनेशियाशी होणार आहे, हा संघ या गटातील सर्वात कमकुवत संघ आहे.