Ravichandran Ashwin: अश्विन बनला कसोटी क्रिकेटचा बादशहा, कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण

WhatsApp Group

Ravichandran Ashwin: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले आहेत. चेन्नईच्या या गोलंदाजाने जॅक क्रॉलीला (15) बाद करून ही कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

अनिल कुंबळेनंतर 500 बळी घेणारा दुसरा भारतीय – अनिल कुंबळेने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने 132 कसोटी सामन्यांमध्ये 29.65 च्या सरासरीने 619 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 31 वेळा 4 विकेट्स आणि 35 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर कपिल देव (434) आणि हरभजन सिंग (417) यांच्या नावावर भारताकडून सर्वाधिक विकेट्स आहेत.

अश्विनच्या कसोटी कारकिर्दीवर एक नजर – अश्विनने 2011 मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्याने भारतासाठी आतापर्यंत 98 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने आपल्या 184 डावांमध्ये 23.82 च्या सरासरीने 500 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 34 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन्ही डावात मिळून 8 वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनची सर्वोत्तम कामगिरी 7/59 अशी आहे.रविचंद्रन अश्विनने 98 कसोटी सामन्यांच्या 184 डावात कसोटीत 500 बळी पूर्ण केले आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 500 बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अनिल कुंबळेने 105 सामन्यांमध्ये 500 कसोटी बळी पूर्ण केले होते. त्याचबरोबर कसोटीत सर्वात जलद 500 बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुथय्या मुरलीधरनने 87 कसोटी सामन्यात 500 विकेट घेतल्या आहेत.

कसोटीत 500 बळी घेतलेल्या गोलंदाजांची यादी

  • मुथय्या मुरलीधरन – 800 विकेट्स
  • शेन वॉर्नने – 708 विकेट्स
  • जेम्स अँडरसन – 695 विकेट्स
  • अनिल कुंबळे – 619 विकेट्स
  • स्टुअर्ट ब्रॉड – 604 विकेट्स
  • ग्लेन मॅकग्रा -563 विकेट्स
  • कोर्टनी वॉल्श – 519 विकेट्स
  • नॅथन लियॉन – 517 विकेट्स
  • आर अश्विन – 500 विकेट्स