Ashoka Pillar On New Parliament: नवीन संसद भवनावर 6.5 मीटरचा अशोक स्तंभ, पंतप्रधान मोदींनी केले अनावरण

Ashoka Pillar On New Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवीन संसद भवनाच्या छतावर 6.5 मीटर लांबीच्या कांस्य राष्ट्रीय चिन्हाचे अनावरण केले. दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी हा अशोक स्तंभ उभारला आहे. नवीन संसद भवनात 1224 सदस्य बसतील. या इमारतीचे बांधकाम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज सुबह नए संसद भवन की छत पर 6.5 मीटर लंबे कांस्य राष्ट्रीय प्रतीक का अनावरण किया। pic.twitter.com/yrsWj3QCJM
— ANI_HindiNews (@AHindinews) July 11, 2022
या नवीन संसद भवनाच्या उभारणीसाठी सुमारे 1000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नवीन संसदेचे संकुल बांधल्यानंतर जुन्या संसद भवनाचे संग्रहालयात रूपांतर होणार आहे.
सरकार आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संसदेच्या वाढत्या कामामुळे नवीन इमारत बांधण्याची गरज भासू लागली होती. सध्याचे संसद भवन ब्रिटीश काळात बांधले गेले आहे, जे सुमारे 93 वर्षे जुने आहे आणि तेथे जागा आणि अत्याधुनिक सुविधांची व्यवस्था नाही.