ऑस्ट्रेलियन ओपन 2022 महिला एकेरीचे विजेतेपद यजमान देशाची महिला खेळाडू असलेल्या अॅश्ले बार्टीने आपल्या नावावर केले आहे ashleigh barty wins Australian open. अॅश्ले बार्टीने अमेरिकेच्या डॅनियल कॉलिन्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे.
A magic moment✨
???????? @ashbarty • #AusOpen • #AO2022 pic.twitter.com/zO6xYLcigH
— #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2022
हा विजय अॅश्ले आणि ऑस्ट्रेलियासाठी खूप खास आहे कारण, 44 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी ख्रिस ओ’नीलने यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
World No. 1 Ash Barty conquers her home Slam. pic.twitter.com/u3Vrvzsfpa
— US Open Tennis (@usopen) January 29, 2022
या विजेतेपदासह 25 वर्षिय अॅश्ले बार्टीने दीर्घकाळापासून सुरू असलेला विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमधील अॅश्ले बार्टीचे हे पहिले ग्रँडस्लॅम आहे, तर यापूर्वी तिने दोन ग्रँडस्लॅम जिंकली आहेत.
ऑस्ट्रेलियन ओपन 2022 चे विजेतेपद मिळवण्यापूर्वी 2019 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2021 मध्ये विम्बल्डन जिंकणारी 25 वर्षीय अॅश्ले बार्टी सध्या टेनिसच्या जागतिक महिला क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.