जगातील नंबर 1 महिला टेनिसपटू एश्ले बार्टीने (Ashleigh Barty) आपल्या फॅन्सना मोठा धक्का दिला आहे. बार्टीने अचानक व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होणार असल्याचा (Ashleigh Barty retires) निर्णय जाहीर केला आहे. बार्टीने सोशल मीडियावर व्हिडीओ मेसेज शेअर करत याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करणार असल्याचे तिने जाहीर केले आहे.
25 वर्षांच्या एश्ले बार्टीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ मेसेज शेअर करत म्हणाली की, ‘आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय अवघड आणि भावनिक आहे. मी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. ही बातमी तुमच्याशी कशी शेअर करावी हे मला कळत नव्हते.
View this post on Instagram
या खेळाने मला जे काही दिले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला त्याचा अभिमान आहे. या वाटचालीमध्ये मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानते. तुमच्यासोबतच्या त्या अविस्मरणीय आठवणी मी कधीही विसरणार नाही. असं ती म्हणाली आहे. 3 वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी एश्ले बार्टी ऑस्ट्रेलियामधील आहे. तिने याचवर्षी महिला एकेरीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.