
विराट कोहली मांडीच्या दुखापतीमुळे ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो सहभागी झाला नव्हता आणि या मालिकेतील (लॉर्ड्स आणि मँचेस्टर) उर्वरित दोन सामन्यांमध्ये तो खेळणार की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या भारताच्या दिग्गज खेळांडूनपैकी एक विराट कोहली काही काळापासून फॉर्ममध्ये नाही. गेल्या चार डावांत त्याला 11, 20, 1 आणि 11 धावाच करता आल्या आहेत. कोहलीने 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेले नाही.
या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे आणि त्यामुळे भारतीय संघ त्यांच्या चांगल्या प्लेइंग इलेव्हनच्या शोधात आहेत. भारताने गेल्या अनेक T20 मालिकांमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे आणि वरिष्ठ खेळाडूंनाही कायम ठेवले आहे. पण आता अडचण अशी आहे की अनेक युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करून संघातील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे, तर काही स्टार खेळाडू खराब कामगिरीमुळे संघाबाहेर जाण्याच्या मार्गावर आहेत. या यादीत कोहलीच्या नावाचाही समावेश आहे.
T20 संघात कोहलीच्या स्थानावर सुरू असलेल्या वादावर भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने विराटच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. नेहराने म्हटले आहे की, विराट सुरुवातीपासून चांगला खेळत आलाय त्यामुळे तो अतिरिक्त संधीस पात्र आहे. कोहलीने ‘बाहेरील लोकांपासून’ दूर राहावे. तुमचे सहकारी, व्यवस्थापन आणि निवडकर्ते तुम्हाला कसे समर्थन देतात हे महत्त्वाचे आहे.. पण आम्ही विराटसारख्या खेळाडूबद्दल बोलत आहोत. त्याने धावा केल्या नाही तरी तो भारताकडून खेळत राहील, असे कुठेही लिहिलेले नाही. पण जेव्हा तुम्ही भूतकाळात खूप काही केले असेल तेव्हा तुम्हाला नेहमीच अतिरिक्त संधी या मिळत राहतील.
नेहरा पुढे म्हणाला, “प्रत्येकाला त्याची उपलब्धी आणि त्याच्याकडे असलेली प्रतिभा माहीत असते. वयाच्या 33 व्या वर्षी फिटनेस ही त्याच्यासाठी समस्या नाही. वेस्ट इंडिज मालिकेनंतर वेगळा विराट पाहायला मिळेल अशी आशा आहे. जर त्याने एक महिना किंवा पाच आठवडे विश्रांती घेतली तर ते त्याच्यासाठी चांगलं राहिलं.