आशिष नेहराने युझवेंद्र चहलला लगावली किक, पाहा Photo

WhatsApp Group

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन्ही टीमना आजच्या सुरू असलेल्या सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. गुजरात टायटन्स पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. तर राजस्थानला पहिल्या सिझनमध्ये आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर तब्बल 14 वर्षांनी फायनलमध्ये जाण्याची संधी आहे.

गुजरात टायटन्सचे हेड कोच आशिष नेहरानं (Ashish Nehra) या क्वालिफायर सामन्यापूर्वी  राजस्थानचा बॉलर युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) एक किक लगावली. गुजरात टायटन्सनंच सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले असून ते सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. अर्थात हा सर्व प्रकार मजेत सुरू होता. नेहरा आणि चहल या दोघांनाही याची कल्पना होती.

गुजरात टायटन्सनं नेहरा आणि चहलचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे की, ‘युझी आणि नेहराजी यांना या किकमुळे चाांगलाच उत्साह आला आहे.’ नेहरा आणि चहल हे दोघंही दिलखुलास हसत असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.