Ashadhi Wari 2022 :माऊलींची पालखी खंडोबाच्या भेटीला

WhatsApp Group

Ashadhi Wari 2022 : सोपान काकाच्या सासवडमध्ये दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळ्याने आज जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मल्हारी मार्तंड खंडोबाला भेटण्यासाठी वारकरी मोठे आतुर झालेले असतात. त्यामुळे सासवड सोडताच येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष कानी पडत आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल यवतमध्ये मुक्काम होता. तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यवतवरुन प्रस्थान ठेवेल त्यानंतर वरवंडमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.