
मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणार एकादशीला ‘आषाढी एकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’ (Ashadhi Ekadashi 2022) असं म्हणतात. हा दिवस संपूर्ण वारकरी मंडळींसाठी फार मोठा दिवस आहे, कारण या दिवशी पंढरपुरात राज्यातील सर्व दिंड्या पोहोचतात व विठ्ठल-रखुमाईच्या पायी नतमस्तक होऊन मोठ्या उत्साहाने हा एकादशीचा उत्सव साजरा होतो.विठ्ठल रुक्माई हे महाराष्ट्राचे दैवत. आषाढी एकादशीच्या दिवशी गेल्या आठशे वर्षांपासून वारकरी संप्रदाय आपल्या दिंड्या, वारी घेऊन विठुरायाच्या भेटीसाठी येत आहेत.
तर अशा या मंगल दिनी आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना खास मराठी संदेश पाठवून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊ शकता.
- देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई ,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर कायम अशी राहो… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालतील वाट हरिची.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- देव माझा विठू सावळा… सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- तुमचिये दासीचा दास करूनि ठेवा, आर्शिवाद द्यावा हाचि मज…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- ह्रदय बंदिखाना केला, आंत विठ्ठल कोंडीला…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- सदा माझे डोळे जडो तुझे मुर्ती, रखमाईच्या पती सोयरिया…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- विठ्ठल विठ्ठल
नाम तुझे ओठी
पाऊले चालती
वाट हरीची…
नाद पंढरीचा
साऱ्या जगा मधी…
चला जाऊ पंढरी
आज आषाढी एकादशी…
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! - हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा - तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा - सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा - पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा