
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट शिवतीर्थ या निवास्थानी झाली. पाठिमागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ख्यातनाम पार्श्वगायिका श्रीमती आशाताई भोसले यांनी शिवतीर्थ निवासस्थानी त्यांची भेट घेतली.#MNSAdhikrut pic.twitter.com/LGEl2KQlbP
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 21, 2022