मुंबई – मराठा आरक्षण (Maratha reservation) आणि इतर मागण्यांसाठी राज्यसभेचे खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje Chhatrapati) मागील गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषणाला बसले होते. आज अखेरीस राज्य सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहे. त्यामुळे संभाजीराजे यांनी लहान मुलाच्या हाताने ज्युस पिऊन उपोषण सोडलं आहे. संभाजीराजे आपल्यासाठी उपोषण करून लढा दिला हे पाहून यावेळी उपस्थितीत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.
मुंबईमधील आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषणाला बसले होते. आज शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेतली आहे. त्यांच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आज आझाद मैदानात ज्या ज्या मागण्या मान्य केल्यात त्याची माहिती दिली संभाजीराजे यांना देण्यात आली. आणि संभाजीराजेंना उपोषण सोडण्यास विनंती केली. त्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.