धोनी मैदानात उतरताच चाहत्यांचा जल्लोष, आंद्रे रसेलला बसल्या कानठळ्या

WhatsApp Group

महेंद्रसिंग धोनीला फलंदाजी करताना पाहण्यासाठी अनेक चाहते वर्षभर आयपीएलची वाट पाहत असतात. धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. धोनी बॅट घेऊन मैदानात येताच स्टेडियममध्ये वेगळेच वातावरण होते. धोनी जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा भारतातील प्रत्येक क्रिकेटचे मैदान हे चेन्नई सुपर किंग्जचे होम ग्राउंड असल्याचे दिसते. आता धोनीच्या चाहत्यांचा जल्लोष पाहून आंद्रे रसेललाही आश्चर्य वाटले आणि चाहत्यांच्या आवाजामुळे त्याने कान बंद केले.

रसेलने कान बंद केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या 22 व्या सामन्यात ही घटना घडली. सामन्यात, लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जने 17 व्या षटकात शिवम दुबेच्या रूपात तिसरी विकेट गमावली, त्यानंतर धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

मात्र, धोनी फलंदाजीला आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी केवळ 3 धावांची गरज होती. धोनीने 3 चेंडूत 1* धावा केली. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला. धोनीने मैदानात प्रवेश करताच स्टेडियममधील चाहत्यांनी आवाज काढण्यास सुरुवात केली आणि हा आवाज इतका मोठा झाला की क्षेत्ररक्षण करणाऱ्या केकेआरच्या आंद्रे रसेलने हाताने कान झाकले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.