Missing Girl | धक्कादायक! राज्यात मार्चमध्ये तब्बल 2200 मुली बेपत्ता

0
WhatsApp Group

राज्यातील मुली हरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च 2023 मध्ये सुमारे 2,200 मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे याचा अर्थ सरासरी दररोज 70 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यात 18 ते 25 वयोगटातील मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक ट्वीट केलं आहे त्या म्हणाल्या, ‘हे चिंताजनक आहे. पोलिसांच्या बेपत्ता व्यक्ती कक्षाने मुली बेपत्ता होण्याची कारणे शोधण्याची गरज आहे.’ याबाबत त्वरित तपास पथक सुरु करण्याची विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे.