Video: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पायलटसह सात जणांचा मृत्यू

WhatsApp Group

Uttarakhand Helicopter Crash: उत्तराखंडमधील केदारनाथ धामच्या दोन किमी आधी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथहून परतत होते, त्याचवेळी हा अपघात झाला. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो केदारनाथ धामचा जुना रस्ता होता. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये सात जण होते. या अपघातात विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे.

केदारनाथहून फाट्याकडे येणाऱ्या आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरला मंगळवारी अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळले तेव्हा त्यात पायलटसह सहा जण होते. सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण खराब हवामान सांगितले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर केदारनाथहून फाटा येथे जाण्यासाठी निघाले होते. यादरम्यान हा अपघात झाला.

या घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सीएम धामी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “केदारनाथजवळील गरुड चट्टी येथे झालेल्या दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात काही लोक जखमी झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.