ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबत वादग्रस्त केलंय. इंपोर्टेड माल इथे काम करत नाही. इथे फक्त ओरिजनल माल काम करतो”, असं वादग्रस्त वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं होतं.
“महाविनाश आघाडी महिलांचा सन्मान करत नाही. अरविंद सावंत काय म्हणतात? तुम्ही इम्पोर्टेड माल आहात. माल म्हणजे आयटम. मला सार्वजनिक जीवनात आतापर्यंत 20 वर्षे झाले. तुम्ही सर्व जाणता की, मी किती निष्ठेनं काम केलंय. मुंबादेवीचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहेत. मी महिला आहे पण माल नाही”, अशी प्रतिक्रिया शायना एन. सी. यांनी दिलीय.
अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले?
अरविंद सावंत यांनी शायना एन. सी. यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. “त्यांची अवस्था बघा. ते आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता दुसऱ्या पक्षात चालल्या गेल्या. इंपोर्टेड माल इथे काम करत नाही, इथे फक्त ओरिजनल माल काम करतो”, असं वक्तव्य अरविंद सावंत म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यामुळं वाद निर्माण झालाय.
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अरविंद सावंत यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलंय. पत्र पाठवत त्यांनी तक्रार केली आहे. “महिलांचा अपमान होईल असं वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.