दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

0
WhatsApp Group

Arvind Kejriwal arrested by ED: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचली होती. 2 तासांहून अधिक काळ चाललेल्या या चौकशीत ईडीकडून 20 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. केजरीवाल यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आता यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे.

आज संध्याकाळी ईडीची टीम मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. त्यानंतरच केजरीवाल यांना अटक होण्याची भीती व्यक्त केली जात होती. यानंतर सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. मात्र, दोघांनाही निवासस्थानात प्रवेश देण्यात आला नाही. यानंतर केजरीवाल यांच्या वकिलांच्या टीमने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, सुनावणी न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा  – IPL 2024: चेन्नईने कर्णधार बदलला; धोनीच्या जागी ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

निवासस्थानाबाहेर सुरक्षा दल तैनात

ईडीचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती मिळताच बाहेर आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. याची माहिती पोलिसांना अगोदरच असल्याने त्यांनी तयारीही केली होती. निवासस्थानाबाहेर जलद कृती दलासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. यासोबतच घराला चारही बाजूंनी बॅरिकेड करण्यात आले होते. दिल्ली दारू घोटाळ्यातील ही 16वी अटक आहे. याआधी बीआरएस नेते के. कवितालाही ईडीने अटक केली होती. यापूर्वी आप नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. हे दोन्ही नेते गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत.