Arrest Kohli : विराट कोहलीला अटक होणार? काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला अटक करण्याची मागणी चक्क नेटकरी करत आहेत. #ArrestKohli सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. खरंतर विराट कोहलीच्या एका चाहत्याने रोहित शर्माच्या फॅनला डोक्यावर बॅट घालून मारलं कारण त्याने आरसीबीची खिल्ली उडवली. हे प्रकरण तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील आहे. येथे 21 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत आपल्या मित्राची हत्या केली. केलापालूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माचा चाहता विघ्नेश आणि विराट कोहलीचा समर्थक धर्मराज हे दोघे दारूच्या नशेत होते.

मल्लूरजवळील सिडको औद्योगिक वसाहतीजवळील मोकळ्या जागेत दोघे क्रिकेटवर चर्चा करत होते. यादरम्यान दोघांमध्ये क्रिकेटवरून वादावादी झाली. विघ्नेशने विराट कोहली आणि आरसीबीची खिल्ली उडवली आणि धर्मराजला हे सहन झाले नाही आणि त्याने त्याच्यावर आधी बाटलीने हल्ला केला आणि नंतर क्रिकेटच्या बॅटने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. यामध्ये विघ्नेशचा मृत्यू झाला.

आपल्या आवडत्या क्रिकेटरचे वाईट ऐकू न आल्याने धर्मराजने त्याच्या मित्राची हत्या केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर ट्विटरवर अरेस्ट कोहली हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर विराट कोहलीने माफी मागावी अशी मागणी होत आहे. विराटने माफी मागितली नाही तर त्याला अटक करावी, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.