राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीसह 26 जणांना अर्जुन पुरस्कार…पहा संपूर्ण यादी
मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन बॅडमिंटनपटूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Arjun Puraskar 2023: भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने यावर्षी देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा अर्जुन पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातील. क्रीडा मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. खेळाडूंना राष्ट्रपतींच्या हस्ते सर्व पुरस्कार प्रदान केले जातील.
सात्विक आणि चिराग यांना खेलरत्न पुरस्कार
बॅडमिंटन कोर्टवर दमदार कामगिरी करणाऱ्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची खेलरत्नसाठी निवड झाली आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न हा क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी दिला जाणारा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. सात्विक 23 आणि चिराग 26 वर्षांचा आहे. त्यांच्या जोडीने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते. 2023 मध्ये या जोडीने स्विस ओपन, इंडोनेशिया ओपन, कोरिया ओपन आणि चायना मास्टर्सचे विजेतेपदही जिंकले.
अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू
- ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी)
- अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)
- श्रीशंकर एम (अॅथलेटिक्स)
- पारुल चौधरी (अॅथलेटिक्स)
- मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
- आर वैशाली (बुद्धिबळ)
- मोहम्मद शमी (क्रिकेट)
- अनुष अग्रवाल (घोडेस्वारी)
- दिव्यकृती सिंग (अश्वस्वार पोशाख)
- दिक्षा डागर (गोल्फ)
- कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)
- पुखरंबम सुशीला चानू (हॉकी)
- पवन कुमार (कबड्डी)
- रितू नेगी (कबड्डी)
- नसरीन (खो-खो)
- पिंकी (लॉन बॉल)
- ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (शूटिंग)
- ईशा सिंग (शूटिंग)
- हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)
- अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
- सुनील कुमार (कुस्ती)
- अंतिम (कुस्ती)
- नौरेम रोशिबिना देवी (वुशू)
- शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)
- इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)
- प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)
कोचिंगसाठी द्रोणाचार्य पुरस्कार 2023
- ललित कुमार (कुस्ती)
- आर. बी. रमेश (बुद्धिबळ)
- महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स)
- शिवेंद्र सिंग (हॉकी)
- गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांबा)