20 षटकात 427 धावा.. एका षटकात 52 धावा; टी-20 क्रिकेटमध्ये अर्जेंटिनाचा मोठा पराक्रम

WhatsApp Group

क्रिकेटमध्ये दररोज विक्रम होतात आणि मोडले जातात, पण काही विक्रम असे देखील असतात. जी वर्षानुवर्षे लक्षात राहतात. असाच एक विश्वविक्रम अर्जेंटिनाच्या महिला क्रिकेट संघाने केला आहे. अर्जेंटिना महिला क्रिकेट संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. अर्जेंटिनाने चिली संघाविरुद्ध हा विक्रम केला आहे. ज्याची आता इतिहासात नोंद झाली आहे.

अर्जेंटिना सर्वाधिक धावा करणारा संघ ठरला

अर्जेंटिना महिला क्रिकेट संघाने शनिवारी पहिल्या टी-20 सामन्यात चिलीवर शानदार विजय मिळवत अनेक विक्रम मोडीत काढले. अर्जेंटिनाने अवघ्या 20 षटकांत एक विकेट गमावून 427 धावांची ऐतिहासिक धावसंख्या उभारली. ज्यामध्ये दोन्ही संघाच्या सलामीवीर लुसिया टेलर (169) आणि अल्बर्टिना गॅलन (145) यांनी धावा केल्या आणि पहिल्या विकेटसाठी 350 धावांची भागीदारी केली. यानंतर गोलंदाजी करताना अर्जेंटिनाने चिलीला अवघ्या 63 धावांत गुंडाळले आणि 364 धावांनी विजय मिळवला. हा सामना पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील कारण टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा – या सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या घरी चोरी; रक्कम ऐकून व्हाल थक्क

एका षटकात सर्वाधिक धावा

या सामन्यात संघाच्या सर्वोच्च धावसंख्येशिवाय अर्जेंटिनाने एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडीत काढला. सामन्यादरम्यान, चिलीच्या फ्लोरनेसिया मार्टिनेझने केवळ एका षटकात 52 धावा दिल्या. तिने 17 नो-बॉलही टाकले. कोणत्याही गोलंदाजाचा एकाच षटकात सर्वाधिक धावा देण्याचा हा सर्वात वाईट विक्रम आहे, जो आता फ्लोरेंझा मार्टिनेझच्या नावावर आहे.

यापूर्वी बहारीन संघाने हा पराक्रम केला होता

अर्जेंटिनाच्या आधी, बहरीनच्या महिला संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ही कामगिरी केली होती. 2022 साली सौदी अरेबिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात बहरीनने 20 षटकात 1 गडी गमावून 318 धावा केल्या होत्या. आता अर्जेंटिनाने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या यादीतील तिसरे नाव संघ युगांडाचे आहे, ज्याने जून 2019 मध्ये माली विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एक गडी गमावून 314 धावा केल्या होत्या.