Agentina Vs France FIFA World Cup: मेस्सीचे स्वप्न पूर्ण, 36 वर्षांनंतर अर्जेंटिना विश्वविजेता
Argentina Vs France Final FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. अर्जेंटिनाकडून शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या लिओनेल मेस्सीने आपल्या विश्वचषक कारकिर्दीचा शानदारपणे शेवट केला. नियमित वेळेत स्कोअर 2-2 असा बरोबरीत होता आणि नंतर अतिरिक्त वेळेत स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने शानदार कामगिरी करत सामना जिंकला.
अर्जेंटिना संघाने विश्वचषकाच्या इतिहासातील तिसरे विजेतेपद पटकावले आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या या संघाने यापूर्वी 1978 आणि 1986 मध्ये विजेतेपद पटकावले होते. याशिवाय अर्जेंटिना तीन वेळा (1930, 1990, 2014) उपविजेता ठरला आहे. दुसरीकडे, फ्रान्स संघाचे सलग दुसऱ्यांदा आणि एकूणच तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले आहे. यापूर्वी फ्रान्सचा संघ 1998 आणि 2018 मध्ये चॅम्पियन बनला होता.
ARGENTINA ARE WORLD CHAMPIONS!! 🇦🇷#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022
फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात 90 मिनिटे उलटूनही विजेत्याचा निर्णय झाला नाही कारण दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. यानंतर 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ खेळवण्यात आला आणि तेथेही अर्जेंटिना आणि फ्रान्स 3-3 असे बरोबरीत होते. पूर्वार्धात अर्जेंटिनाकडे 2-0 अशी आघाडी होती. लिओनेल मेस्सीने 23व्या मिनिटालाच पेनल्टीवर गोल करत अर्जेंटिनाचे खाते उघडले. अर्जेंटिनासाठी मेस्सीचा हा 97 वा गोल आहे. यानंतर एंजल डी मारियानेही 36व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022
हाफ टाईमपर्यंत 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर कायलियन एमबाप्पे फ्रान्सचा मसिहा म्हणून उदयास आला. 79व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केल्यानंतर एम्बाप्पेने 82 व्या मिनिटाला गोल करून फ्रान्सला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. अतिरिक्त वेळेच्या 30 मिनिटांच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते आणि खेळाच्या उत्तरार्धात 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात मेस्सीने गोल केला. अर्जेंटिनासाठी मेस्सीचा हा 98 वा आणि या फिफा विश्वचषकातील 8 वा गोल आहे. यानंतर कायलियन एम्बाप्पेनेही पेनल्टीवर गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि गुणसंख्या 3-3 अशी बरोबरीत आणली.
यानंतर अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये गतविजेत्या फ्रान्सचा 4-2 असा पराभव करत तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला.